आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरकरांना दिलासा:मार्चअखेर पूर्ण होणार भूमिगत गटार, 70 पैकी 13 किमीचेच काम बाकी

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या भूमिगत गटारींचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. शहरात एकूण ७० किमी लांबीच्या भुयारी गटारीचे बांधकाम पालिकेने हाती घेतले आहे. त्यापैकी ५७ किमीपर्यंत काम पूर्ण झाले असून, उर्वरित १३ किमीचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

शहरात ए, बी, सी, डी, ई आणि एफ अशा सहा झोनमध्ये भूमिगत गटारींच्या कामास सुरुवात झाली होती. त्यात सर्वाधिक काम ‘ए’ झोनमध्ये झाले असून त्याची टक्केवारी ९५ टक्के आहे. तर ‘बी’ झोनमध्ये कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी पावसाळ्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे पावसाळा सपल्यानंतर आता या कामाला गती देण्यात आली आहे. त्या झोनमध्ये ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ‘सी’ झोनमध्ये ८० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. ‘डी’ झोनमध्ये कॉलनी परिसरात कामे झाली आहेत. तर मुख्य रस्त्यावरील कामास सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ‘ई’ झोन मध्ये ६० तर एफ झोन मध्ये ७५ टक्के काम झालेले आहे.

खड्डेमय रस्ते दुरुस्त होणार शहरात अनेक कॉलन्यांचा परिसर व मुख्य रस्त्यावरील गटारींसाठी खोदकाम झाले आहे. त्याठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र त्या रस्त्यांची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. भूमिगत गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम ज्या ठिकाणी झाले, त्या रस्त्यांची दुरुस्तीही मार्चपर्यंत होणार आहे.

अडचणी दूर झाल्या शहरातील भूमिगत गटारींच्या कामांची मजुरांआभावी गती मंदावली होती. मात्र सर्व अडचणी दूर झाल्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्चपुर्वीच काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. संतोष चौधरी, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

का आल्या अडचणी ? भूमीगत गटारीसाठी खोदकामाला पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण झाल्याने कामाची गती मंदावली होती. पावसाळ्यातही ज्या ठिकाणी काम करता येणे शक्य होते, त्या ठिकाणी कामे करण्यात आली. मात्र त्या कामांना गती नव्हती. मात्र आता पावसाळा संपला व दिवाळीला घरी गेलेले कामगार परत आल्यानंतर कामाला गती मिळाली आहे. शहरात स्टेशनरोड ते बोरी नदी, बस स्थानकामागील भाग, झामी चौक व सुरभी कॉलनी या ठिकाणी कामास गती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...