आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक हल्ला:जोगलखेड्यातील शेतकऱ्याचा रानडुकराच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या जोगलखेडा येथील शेतकऱ्याचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपार चार वाजेदरम्यान घडली.तालुक्यातील जोगलखेडा येथील शेतकरी जितेंद्र गोपीनाथ पाटील (वय ४२) हे आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. या वेळी रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जितेंद्र पाटील यांनी आरडाओरडा केल्याने जवळपासच्या शेतातील मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेतली.

मात्र, पाटील यांना तोपर्यंत मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी पोलिस पाटील विजय पाटील यांना संपर्क केला. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रूग्णवाहिकेला बाेलावून जितेंद्र पाटील यांना तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, १ मुलगी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...