आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:रेल्वेखाली आल्याने अनोळखी प्राैढाचा मृत्यू

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कजगाव रेल्वे स्थानकानजीक (रेल्वे खंबा क्रं. ३४६ /११ /१३) डाऊन मार्गावर कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी प्राैढाचा मृत्यू झाल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रास मिळाली. त्यानंतर पोलिस हवालदार मधुसूदन भावसार व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.

भावसार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत प्राैढाचे वय अंदाजे ४० वर्ष असून मृताजवळ कोणताही ओळखीचा पुरावा मिळालेला नाही. मृताचा रंग सावळा, उंची ५ फुट २ इंच, अंगात पांढरा फुल बाहीचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. या प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...