आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:खडकदेवळा येथे 70 विद्यार्थ्यांना गणवेश

पाचोरा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. आर. सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून ३५ मुलं व ३५मुली असे मिळून एकूण ७० विद्यार्थ्यांना गणवेश दिले. शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रमोद गरुड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शालेय जीवनातील शिक्षणाच्या संधीचा सदुपयोग करून यशस्वी भविष्याकडे कशा पद्धतीने वाटचाल करता येऊ शकते, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षक एस. एन. पाटील यांनी केले. एन. एन. पाटील व वाय. बी. परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन एस.टी.घोडेस्वार यांनी केले. स्वप्नील बागुल, एस. जी. बाविस्कर, एस.पी.राजपूत उपस्थित उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...