आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:कृषीसाठी अखंडित वीजपुरवठा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ‘आप’चे धरणे आंदोलन; भडगाव, चाळीसगावात तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांना सादर केले निवेदन

भडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२१मध्ये अतिवृष्टीसह अन्य कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान वाटप केले. मात्र, अद्यापही हे अनुदान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ मिळावा, सुरळीत वीज मिळावी, नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी ९ मे रोजी सकाळी १० वाजेपासून येथील आम आदमी पार्टीतर्फे भडगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आहे.

शेतकऱ्यांवर महाराष्ट्र सरकार अन्याय करत आहेत. शेतकऱ्यांच्या मुख्य मूलभूत प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त व हिताच्या असून सरकारने तत्काळ लक्ष घालून या सोडवाव्यात, असे मत आम आदमी पार्टीचे अॅड. के. टी. पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार बबनराव निकम, योगेश संभाजी पाटील, गौरव दीपक धनगर, अविनाश निंबा हिरे, नीलेश भिला पाटील, योगेश दौलत पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खरीप हंगामात सुरुवातीला दोन वेळा पाऊस झाला.

त्यानंतर अतिवृष्टी झाली. खरीप विमा जोखीम २५ टक्के ही ६ महिन्यांनंतर मिळाली, मात्र, उर्वरित ७५ टक्के नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. हे अनुदान त्वरित वाटप व्हावे, यासह अन्य मागण्यांसाठी आम आदमी पार्टीने धरणे आंदोलन सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन तालुका कृषी अधिकारी रवींद्र गोर्डे त्याचप्रमाणे भडगाव येथील तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...