आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वडजी येथील उपसरंपचपदी समाधान पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आपसात ठरल्याप्रमाणे परिवर्तन पॅनलच्या इंदिराबाई पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्या जागेवर समाधान पाटील यांची निवड झाली आहे. वडजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा इंदिराबाई पाटील यांनी ठरल्याप्रमाणे ११ रोजी राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर नुकतीच निवडणूक घेण्यात आली.
यात उपसरपंच पदासाठी समाधान पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच मनीषा गायकवाड, माजी सरपंच सुभाष पाटील, परिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक कैलास पाटील, राजेंद्र सोनवणे, दुध डेअरीचे चेअरमन रणधीर पाटील, बापूराव कुळकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी, स्वदेश पाटील, मेहमूद पटेल, किशोर मोरे, संभाजी मोरे, इंदिराबाई पाटील, पूनम सोनवणे, उज्ज्वला पाटील, नारायण पाटील, रघुनाथ अहिरे, सोसायटीचे माजी चेअरमन बाबाजी पाटील, डाॅ. दीपक परदेशी, सुधाकर पाटील, समाधान मोरे, माधवराव पाटील, पपेश पाटील, महारू पाटील, पिंटू गायकवाड, रूपेश पाटील, पिचर्डे येथील अनिल महाजन हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच मनीषा गायकवाड तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी ए. एम. राठोड यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.