आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:मराठा सेवा संघाची बिनविरोध निवड; शहराध्यक्षपदी प्रशांत गायकवाड तर तालुकाध्यक्षपदी अरुण पाटलांची वर्णी

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शासकीय विश्रामगृहात ३ रोजी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी सर्वानुमते शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली. त्याप्रमाणे नियुक्ती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील उपस्थित होते.

या वेळी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. जयवंतराव देवरे, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष सुधीर पाटील, डी. वाय. चव्हाण, अविनाश देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, माजी विस्ताराधिकारी आर. जी. पाटील, योगेश पाटील, भरत नवले, प्रदीप देशमुख, नगरसेवक दीपक पाटील, विनोद पाटील, डॉ. गुणवंतराव शेळके, प्रा. जगदीश सूर्यवंशी, भगवान पाटील, हर्षल पाटील, राजेश मांडोळे, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, गणेश देशमुख, मनीष देवकर, राजेंद्र मोरे, नीलेश पाटील, रघुनाथ जगताप, किशोर पाटील, सुनील चव्हाण, एन. एम. पाटील, सूर्यकांत वाघ, गणेश पवार, संजय कापसे, राकेश बोरसे, राजू मांडे यांच्यासह सर्व मराठा सेवा संघाचे सदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते. बैठकीनंतर कार्यकारिणीत नियुक्त झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समाजबांधवांतर्फे सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...