आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनदोस्त:अवकाळी पाऊस, वादळाने मुंदाणे, तामसवाडी येथील पिके जमीनदोस्त

मुंदाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा तालुक्यातील अवकाळी पावसाने थैमान घातले हाेते. तामसवाडीसह मुंदाने प्रउ येथे १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री आलेल्या या वादळामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील शेतामधील पिके आडवी पडली आहेत.

अनियमित व अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला हाेता. त्याची भर रब्बी हंगामात काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मशागत करून गहू, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांची लागवड केलेली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च ही केला आहे. मात्र, पिके एेन जोमात असताना १५ राेजी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिके आडवी पडली आहेत.

त्वरीत पंचनामा करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी
तलाठी, कृषी पर्यवेक्षक यांना शेतात पाठवून त्वरित पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी मुंदाणे येथील पोलिस पाटील अशोक पाटील व शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, मुंदाणे परिसरातील संदीप पाटील, अभिषेक पाटील, लक्ष्मण पाटील, किशोर पाटील, शोभाबाई पाटील, अलकाबाई पाटील, निंबा पाटील, अशोक पाटील, कांतीलाल जाधव, दगडू पाटील, वंदनाबाई पाटील आदी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पीक पूर्णतः आडवा पडला आहे. याबाबत टाळाटाळ केल्यास पुढील गोष्टीला प्रशासन जबाबदार राहिल, अशा भावना शेतकऱ्यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...