आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिद स्मारक उभारण्यात आले:शहीद जवानाच्या स्मारकाचे अनावरण

अमळनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर मधील सैन्य दलाच्या मोहिमेत शहिद झालेल्या गलवाडे येथील सैनिक सदाशिव माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचे स्वातंत्र्य दिनी अनावरण करण्यात आले.गलवाडे येथील सैनिक सदाशिव माधवराव पाटील यांचा २३ जून २००८ रोजी कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ गलवाडे येथे शहिद स्मारक उभारण्यात आले आहे.

या स्मारकाचा अनावरण सोहळा स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त १५ ऑगस्टला आयोजित केला होता. प्रारंंभी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी एन. टी. मुंदडा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व खान्देश रक्षक फाउंडेशन संघटनेने काढलेल्या ३०१ फूट तिरंगा रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. यानिमित्त गावात ठिकठिकाणी रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. शहिद स्मारकाचे अनावरण माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अॅड. तिलोत्तमा पाटील, महेंद्र बोरसे, श्याम अहिरे, संदीप घोरपडे, विजय सूर्यवंशी, राजेंद्र यादव, धनराज पाटील, विलास महाले, जगदीश पाटील, रऊफ पठाण, विनोद पाटील, संजय पाटील, गणेश महाजन, महेंद्र भावसार तसेच खान्देश रक्षक फाउंडेशन, आजी-माजी सैनिक फाउंडेशनचे सदस्य व ग्रामस्थ हजर होते.

बातम्या आणखी आहेत...