आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती दिनाचे औचित्य:माजी मंत्री स्व.पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण ; पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाडी शेवाळे येथे क्रांती दिनाचे औचित्य साधत, माजी मंत्री कै. के. एम. बापू पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण वाडी शेवाळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाले. सरपंच रेखाबाई पाटील व मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविकात स्व. पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी तर जयदेव पाटील यांनी आभार मानले. या वेळी सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील, उपसरपंच सोपान पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, संध्या पाटील, लताबाई पाटील, सीमा पाटील, प्रवीण पाटील, पोलिस पाटील संजय पाटील, डॉ. एल. टी. पाटील, डॉ. शेखर पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...