आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञाताने कपाशीची झाडे उपटून फेकल्याचा प्रकार:दस्केबर्डीत कपाशीची झाडे उपटल्याने नुकसान

बहाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दस्केबर्डी येथील दाेन शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञाताने कपाशीची झाडे उपटून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. शेतकरी दशरथ बाबूलाल अहिरे यांच्या गट क्रमांक ११२ मधील ७० आर पैकी एक एकरावरील उभी कपाशीची एक हजार ते बाराशे उभी झाडे उपटून फेकली. लगत संचिलाल आनंदा बोरसे यांचीही ५० कपाशीची झाडे उपटले आहेत.

शनिवारी सकाळी सात वाजता शेतकरी गुलाब बोरसे शेतात गेले असता हा प्रकार उघड झाला. दशरथ अहिरे यांनी शेतात धाव घेतली. हातातोंडाशी आलेला घास अज्ञात इसमांनी हिरावून घेतल्याने नुकसान झाले. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...