आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वधर्मीयांच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या येथील पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबांच्या उर्सला रविवारपासून सुरूवात होत आहे. यानिमित्त पीर मुसा कादरी यांच्या दर्ग्यावर राेषनाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. आठवडाभर सुरू राहणाऱ्या या उर्समध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खबरदारीच्या उपाययोजना चाळीसगाव शहर पोलिस ठाणे, नगर पालिका व दर्गा ट्रस्ट कमिटीतर्फे करण्यात आल्या आहेत.
उर्स शांततेत पार पडण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री शांतता व मोहल्ला समिती, पोलिस मित्र सदस्यांची बैठकही घेण्यात अाली. सर्व-धर्मीयांचे प्रतिक असलेल्या बामोशी बाबा यांचा उर्स ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बामोशी बाबांच्या उर्साचे यंदाचे ७३३वे वर्षे आहे. रविवारी बाबांच्या समाधी स्नानाने उर्सला सुरूवात होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संदल व ७ रोजी
पूज्य तलवार मिरवणूक आहे. या पार्श्वभूमीवर उर्समध्ये झुले, पाळणे येथे महिला पोलिसांची नियुक्ती करणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, वीजपुरवठा खंडीत होणार नाही याच्या दक्षतेबरोबरच भाविकांसाठी सोई, सुविधा पुरवण्याची मागणी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली.
लाखोंची हाेणार उलाढाल राज्यभर प्रसिद्ध असलेल्या बामोशी बाबांच्या उरसात संसारोपयोगी साहित्यासह पूजेचे साहित्य, खाद्य पदार्थ, खेळणी, पाळणे, करमणूकची साधने व इतर अनेक वस्तूंची दुकाने थाटली जातात. उर्समध्ये मुंबई, धुळे, अाैरंगाबाद, नाशिक, कन्नडसह शेजारच्या भागातून व्यावसायिक येत असतात. यातून लाखाेंची उलाढाल हाेत असते.
यांची हाेती उपस्थिती या बैठकीस उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, पाेनि के. के. पाटील, वाहतूक शाखेचे सपाेनि तुषार देवरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. उर्सच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात अाला. उर्स शांततेत पार पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.