आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत अंतुर्ली येथे लोकनियुक्त सरपंचपदी उषा भाईदास मोरे यांनी ३४१ मतांनी विजय मिळवला. त्यांना ७५८ मते मिळाली.
त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार छाया संजय गायकवाड यांचा पराभव केला. त्यांना ४१७ मते मिळाली. निवडणुकीत विजयी झालेले सदस्य पदाचे उमेदवार (कंसात मिळालेली मते) : वाॅर्ड क्रमांक १- बालू छोटूलाल मोरे (१९६), पुष्पाबाई खंडेराव पैठणकर (२०५), यशवंत सुकदेव पाटील (बिनविरोध), वाॅर्ड क्रमांक २- मनोज प्रकाश पाटील (४५०), ज्योतिबाई दीपक भिल (३८९), धनश्री लक्ष्मण पाटील (३५९) व वाॅर्ड क्रमांक ३- प्रतिभा प्रवीण पाटील (२१८), सखुबाई चंद्रभान बनकर (२०१), मनोज रामराव पाटील (बिनविरोध). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आय.बी. देशमुख यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.