आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लसीकरण:तळवण-तांडा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे लसीकरण

भडगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरखेड येथील आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य पथक तयार करुन तळवण-तांडा येथील मथुराई शिक्षण संस्था संचालित तात्यासो पुंडलिक चिंधा पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी मोहिम राबवण्यात आली.

ही मोहिम तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुचिता आकडे व पिंपरखेडचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रतिक भोसले यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. या मोहिमेचे नियोजन आमडदे येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी केले हाेते. या मोहिमेंतर्गत ९५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य पथकात डाॅ. प्रतिक भोसले, आमडदे येथील डाॅ. रंजन देसले, वडजी येथील डाॅ. आकाश निकाळजे, पळासखेडा येथील डाॅ. हनुमान साखरे व आमडदे येथील आरोग्यसेविका वंदना निकम उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...