आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान:लंपीचा धोका टळण्यासाठी दोन हजार जनावरांचे हिवरखेडा येथे लसीकरण

जामनेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर हिवरखेडा येथे रविवारी तब्बल २ हजार गुरांचे लसीकरण करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या लसीकरणाला गावातीलच शिव कृपा दुध डेअरीचे सहकार्य लाभले.गुरांवरील लिंपी या आजाराने पशुपालक त्रस्त झाले आहेत. संसर्गजन्य असलेल्या या आजाराचा प्रसार होण्यापूर्वीच गुरांचे लसीकरण करणे हा यावर पर्याय आहे. मात्र, त्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये अद्याप लस उपलब्ध झालेल्या नाहीत. असे असले तरी बाजारात मात्र या लस उपलब्ध असल्या तरी त्याबाबत शेतकऱ्यांना अद्याप माहिती नाही.

त्यामुळे माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील यांनी स्वखर्चाने आपल्या गावातील सर्व गुरांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना गावातील शिव कृपा डेअरीने सहकार्य केले. रविवारी सकाळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेस सुरूवात करण्यात आली. या वेळी गोचीड व माशांमुळे हा आजार पसरत असल्याने आधी गुरांवर औषधाची फवारणी केली. या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ खोडके, डॉ. श्रीकांत व्यवहारे, मदतनीस संजय पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिलासा
गावात शेतकऱ्यांची संख्या मोठी असून गुरेही मोठ्या प्रमाणावर आहेत. अशावेळी लंपीसारख्या जीवघेण्या आजारामुळे पशुधन धोक्यात आले आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजारच होऊ नये, यासाठी अमर पाटील यांनी लसीकरणाची मोहिम सुरू करून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे.
देविदास जोहरे, सरपंच, हिवरखेडा

बातम्या आणखी आहेत...