आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:बाप्पाच्या मिरवणुकीवर वरुणराजाने केला जलाभिषेक; पाचोऱ्यात जल्लोष

पाचोरा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यासह शहरात गणेश विसर्जनापूर्वी सायंकाळी ६ वाजता विजेच्या सुमारास कडकडाटासह वरुण राजाचे सरी बरसल्या. याचवेळी गणेश भक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीत सुरवात केली. पाऊस सुरू झाल्यानंतरही गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायला भावपूर्ण निराेप दिला.

गणेश भक्तांनी ट्रॅक्टर, रिक्षा, चार चाकी, दुचाकीवरुन मोठ्या उत्साहात सवाद्य नृत्य करुन मिरवणुकीत सहभाग घेतला हाेता. कोरांनामुळे दोन वर्षापासून गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र, यावर्षी महिला, युवक, युवतींसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहात भर पाडली. शहरातील बहुतांशी श्रींचे बहुळा प्रकल्पात विसर्जन करण्यात आले. काहींनी भडगाव कडील तितूर, गिरणा नदी, बांबरूड महादेवाचे येथील तितूर नदीच्या संगमावर, काहिंनी पुनगाव व गिरड जवळील गिरणा नदीपात्रात तर काहींनी हिवरा नदीपात्राच्या आयटीआय जवळील डोहात श्रींचे विसर्जन केले.

पाचोरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बहुळा प्रकल्पावरील पुलावर पालिका प्रशासनाने मंडप टाकून ५ पट्टीचे पोहणारे, दोन ट्यूब, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या जवानांसह वाहने तसेच पोलिस आणि पालिकेचे कर्मचारी तैनात केले होते. पाचोरा येथील विसर्जन मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज चौक, भुयारी मार्ग, जामनेर रोड, बाहेर पुरा, कृष्षापुरी, गोराडखेडा येथून बहुळा प्रकल्पा जवळ आली. तर भडगाव रोडवरील मिरवणुका जारगाव चौफुली मार्गे गोराडखेडा येथून बहुळा प्रकल्पा जवळ नेण्यात आल्या. यानिमित्त शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पाचोरा नगर परिषदेने संभाजी महाराज चौक, शिवाजी महाराज चौक, जारगाव चौफुली, कामगार मैदान, गांधी चौक व जळगाव चौकासह ८ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तयार केले होते.

बातम्या आणखी आहेत...