आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फूर्तीदायक:प्रखर देशभक्तीचा निखारा‎ म्हणजे वीरभाई कोतवाल‎ ; शिवव्याख्याते सुनील पाटील यांचे प्रतिपादन‎

भडगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीरभाई कोतवाल यांचा स्वातंत्र्याच्या ‎ ‎ चळवळीतील त्याग व बलिदान आजही ‎ ‎ स्फूर्तीदायक आहे. त्यांचे कार्य थोर ‎ ‎ क्रांतिकारकांच्या बरोबरीचे आहे. ‎ ‎ स्वातंत्र्यासाठी परकियांसोबत तर‎ दुसरीकडे गरीब शेतकऱ्यांना सावकारी ‎ ‎ पाशातून मुक्त करण्यासाठी‎ स्वकियांसोबत, अशा दोन्ही लढाया,‎ त्याग आणि प्रखर देशभक्तीच्या‎ कसोटीवर लढणारे महायोद्धा म्हणजे वीर ‎ ‎ भाई कोतवाल आहेत, असे विचार शिव ‎ ‎ व्याख्याते सुनील पाटील बांबरुडकर‎ यांनी व्यक्त केले. ते विठ्ठलराव‎ लक्ष्मणराव उर्फ भाई कोतवाल यांच्या‎ पुण्यतिथी निमित्ताने //"क्रांतिरत्न हुतात्मा‎ वीर भाई कोतवाल यांचे चरित्र आणि‎ विचार//" या विषयावर आयोजित‎ कार्यक्रमात बोलत होते.‎ अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक‎ एस. डी. न्हावी होते. श्री संत सेना‎ महाराज नाभिक समाज मंडळातर्फे‎ हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची‎ पुण्यतिथी साजरी करण्यात आली.‎

यावेळी भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे‎ पूजन व माल्यार्पण सुनील पाटील,‎एस.डी.न्हावी, अध्यक्ष संजय पवार,‎ उपाध्यक्ष रवींद्र शिरसाठ, सचिव अॅड.‎ भरत ठाकरे यांच्यासह उपस्थित समाज‎ बांधवाच्या हस्ते करण्यात आले.‎ शिवचरित्रकार सुनील पाटील पुढे‎ म्हणाले की, २ जानेवारी हुतात्मा भाई‎ कोतवाल यांंचा स्मृतिदिन आहे. केवळ‎ फितुरीने इंग्रजांच्या जाळ्यात अडकून‎ अवघ्या ३१ व्या वर्षी हौतात्म्य प्राप्त‎ झालेले, विठ्ठलराव लक्ष्मणराव उर्फ भाई‎ कोतवाल. इतिहासाने त्याची फारशी‎ दखल घेतली नसली, तरी सकल‎ समाजास त्यांच्या बलिदानाचे महत्व‎ आहे.

तसेच महापुरुषांनी ज्या पद्धतीने‎ सकल समाजासाठी कार्य केले त्याच‎ पद्धतीने पुढील पिढीने त्यांच्या‎ विचारधारेनुसार काम करावे. सध्या‎ नवतरुण पिढी ज्या पद्धतीने व्यसनाधीन‎ होत चालली आहे. त्यांना व्यसनापासून‎ दूर कसे ठेवले जाईल याबद्दल प्रयत्न‎ करावा, असे विचार व्यक्त केले. नाभिक‎ समाज विकास मंडळाचे अध्यक्ष संजय‎ पवार, उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव‎ ॲड. भरत ठाकरे, कार्यकारणी सदस्य‎ दिलीप वेळीस, सुभाष ठाकरे, विनोद‎ शिरसाठ, सूर्यभान वाघ, दिलीप‎ शिरसाठ, भगवान नेरपगार, किशोर‎ निकम आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...