आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:खेडगाव विकासोत सत्ताधाऱ्यांची विजयी हॅट्ट्रिक; विरोधी पॅनलचे विजयाचे खातेही उघडले नाही

चाळीसगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वार्षिक साडेपाच कोटींची आर्थिक उलाढाल असणाऱ्या आणि जिल्हा बँकेंने गौरवलेल्या खेडगाव विकासो निवडणुकीत, अविनाश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने सर्व १३ जागा जिंकून, विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. सहकार पॅनलने प्रतिस्पर्धी प्रफुल्ल साळुंखे व पंकज साळुंखे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.

अविनाश चौधरी यांना सर्वाधिक ६५९ मते मिळाली. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. खेडगाव, खेडी व दस्केबर्डी या गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीसाठी महिला राखीवसह ओबीसी, अनु. जाती - जमाती, व कर्जदार खाते प्रतिनिधी अशा एकूण १२ जागांसाठी चुरशीच्या लढती झाल्या. संस्थेचे १६५० सभासद आहेत. सहकार पॅनलचे भानुदास लुका रावते हे भटक्या - विमुक्त गटातून बिनविरोध निवडून आले. यामुळे प्रतिस्पर्ध्यांना विजयाचे खातेही उघडता आले नाही. रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर मतमोजणी करण्यात आली. यात सहकार पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडवला. निवडणुक यशस्वी करण्यासाठी अरुण पाटील, के.बी.साळुंखे, रावसाहेब साळुंखे, मोहन चौधरी, पांडुरंग माळी, देवीदास साळुंखे, खेडी सरपंच संजय हिंमत पाटील, हिंमत महाजन, आर. डी. चौधरी, परमेश्वर रावते, दगडू पाटील, दस्केबर्डी सरपंच गणेश अहिरे, शब्बीर सुलेमान पिंजारी, जयराम पांडू पाटील, संभाजी साळुंखे, संभाजी बारीकराव साळुंखे, रमेश सोनवणे, शांतीलाल अहिरे, सचीव संजय पाटील यांनी सहकार्य केले. निवडणुकीपुर्वी चुरशीची लढत होईल, असे वाटत होते. मात्र, लढत एकतर्फी झाली.

पारदर्शी कारभारावर विश्वास
१७ ते १८ वर्षांपासून सोसायटीत नेतृत्व करत आहे. या काळात संस्थेला उर्जितावस्था मिळवून दिली. सभासद करतांना योग्य व्यक्तिची अडवणूक केली नाही. सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेतांना कारभार पारदर्शी ठेवला. यामुळेच ग्रामस्थांनी सलग तिसऱ्यांदा विजयी विश्वास दाखवला. हा विजय त्यांनाच समर्पित. - अविनाश चौधरी, चेअरमन

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
लिलाबाई अरुण पाटील, मनिषा रमेश साळुंखे, अविनाश जगन्नाथ चौधरी, हिरामण पिरा केदार, भानुदास लुका रावते, छोटू गरबड पाटील, ज्ञानेश्वर बारकु पाटील, शिवाजी बळीराम महाजन, सुकलाल धोंडू महाजन, भिमराव कौतिक माळी, अशोक निळकंठ साळुंखे, दिनकर त्र्यंबक साळुंखे, विजय माधवराव साळुंखे.

बातम्या आणखी आहेत...