आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय‎:आडगावात शेतकरी पॅनलचा विजय‎

चोपडा‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आडगाव विकासोच्या ‎निवडणुकीत १९ रोजी शेतकरी‎ विकास पॅनलने ११ जागांवर‎ दणदणीत विजय प्राप्त केला. चार ‎ ‎ दशकांपुर्वी कै. तुकाराम जिभाऊंनी ‎नेतृत्व केलेल्या विकासोत पुन्हा‎ त्यांचे नातू शामकांत भागवत पाटील ‎यांनी सत्ता मिळवली.‎ शेतकरी विकास पॅनलने १३ जागा‎ लढवल्या. या पॅनलचे नेतृत्व माजी‎ सरपंच पंडित रामदास पाटील,‎ ताराचंद तुकाराम पाटील, व‎ लोकनियुक्त सरपंच रावसाहेब‎ पाटील आदींनी केले. विजयी‎ उमेदवार व त्यांना पडलेली मते‎ कंसात याप्रमाणे- माळी नामदेव‎ बाबुराव (२०५), पाटील संभाजी‎ गोरख (१९६), पाटील शामकांत‎ भागवत (१९१), पाटील हिरालाल‎ दामोदर (१८७), चौधरी दिनकर‎ प्रल्हाद (१८१), पाटील भोमा‎ जयसिंग(१८०), पाटील सुनील‎ डोंगर (१७४), महिला राखीव‎ मधुन कांताबाई रामकृष्ण पाटील‎ (१९२), पाटील लताबाई विजय‎ (१८९), अ. जा.ज महाले भिवसन‎ मंगा (१९५), भटक्या विमुक्त‎ जातीमधून धनगर भास्कर दोधू‎ (१९९) हे ११ संचालक विजयी‎ झाले. तर परिवर्तन पॅनलचे संजय‎ केशरलाल पाटील (१८९) व भादू‎ बंडू पाटील(१७३) हे विजयी झाले‎ आहेत.

ज्या जागेकडे गावाचे लक्ष‎ लागून होते ती जागा म्हणजे ललित‎ पाटील यांचा मात्र पराभव झाला‎ आहे. निवडणूक व मतमोजणी‎ प्रक्रिया ही शांततेत पार पडली.‎ निवडणूक निर्णय अधिकारी आय.‎ बी. तडवी, जे.एस. चौधरी, ओम‎ भावसार, ए. एस.तडवी, फकीरा‎ तडवी आदींनी कामकाज पाहिले.‎

बातम्या आणखी आहेत...