आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी निवड:कास्ट्राईब वन अध्यक्षपदी विकास सोनवणे

यावल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वन विभाग कार्यालयाजवळील सभागृहात रविवारी कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा झाला. त्यात आगामी वर्षातील विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे नियोजन व कार्यकारिणी निवड झाली. त्यात जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विकास सोनवणे, तर जिल्हा सचिवपदी योगिराज तेली यांना संधी मिळाली.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे होते. सुरुवातीला कर्मचारी सभासद आढावा, परिचय, राज्यस्तरीय संघटना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्यांवर चर्चा झाली. यानंतर जळगाव जिल्हा कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सोनवणे, उपाध्यक्षपदी योगेश सोनवणे, नोकेश बारेला, जिल्हा सचिवपदी योगिराज तेली, कोषाध्यक्षपदी अनिल पाटील, सहसचिव राकेश निकुंबे, महिला आघाडी उपाध्यक्ष सविता वाघ, संघटक हनुमंत सोनवणे, प्रमिला मराठे, सरला भोंगरे, सोनाली बारेला यांची निवड झाली. बैठकीत संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष सुमित भुईगड, व्ही.जी.जाधव, मनोज कांबळे, अमोल वाघमारे, डी.एस.थोरात, विकास अवचार, प्रभाकर पारवे उपस्थित होते. पुलकेशी केदार, बापू साळुंखे, साधना बाविस्कर, राजेंद्र राणे, योगेश अडकमोल यांनी सहकार्य केले. तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल, तसेच सर्वसामान्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...