आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विश्व हिंदू परिषद; बजरंग दलातर्फे प्रांतांना निवेदन

पाचोरा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यातर्फे पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही काळापासून देशभरात इस्लामिक जिहादी कट्टरता वाढत आहे. हिंदूंवर योजनापूर्वक हल्ले होत असून त्यांची घरे, दुकाने आणि वाहने जाळण्यात आली.

तसेच सरकारी मालमत्ता आणि मंदिराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या हल्ल्यांमुळे संपूर्ण देशातील हिंदू समाज दुखावला असून संतप्त झाला आहे. देशभरातून हिंदू समाज या घटनेविरोधात धरणे आणि निवेदनाद्वारे तीव्र संताप व्यक्त करत आहे. त्यामुळे जिहादी भाषणे देण्याऱ्या व्यक्तींना ताबडतोब थांबवावे, दंगल घडवणाऱ्या दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...