आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभा प्रकाश माळी यांची निवड झाली. तर ग्रामपंचायत सदस्यपदी सुनिता उगलाल पाटील, रूपाली किरण पाटील, रेखाबाई विजय सूर्यवंशी, भारतीबाई राजू भिल, शोभाबाई दिलीप माळी, धनराज योगराज माळी, देविदास महादू पवार, अजय तानकु बाम्हणे यांची निवड झाली. ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने दावा केला आहे. पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या गावाजवळी नाल्याला पूर आल्यास पावसाळ्यात संपर्क तुटत होता.
यामुळे मागील काळात मंत्री पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाचे बांधकाम झाले. यामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुखकर झाला आहे. त्याचेच फलित म्हणून या ग्रामपंचायतवर शिंदे गटाची एकहाती सत्ता आली असे प्रतिपादन माजी सरपंच उगलाल पाटील यांनी केले. निवडणूक प्रक्रियेनंतर विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगवान महाजन, माजी सरपंच किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य उगलाल पाटील, प्रशांत पाटील, सोपान पाटील, शशिकांत महाराज, संजय भामरे, विवरे येथील भैया माळी, दिलीप माळी, मोतीलाल पाटील, शशिकांत माळी, आबासाहेब पाटील उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.