आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बट्ट्याबोळ:शाळेत मुलांना बसवून राबवले मतदान अभियान

पहूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगामार्फत सद्यःस्थितीत मतदार नोंदणी व मतदान कार्डाला आधार लिंक करण्याचे अभियान सुरु आहे. त्यासाठी नुकतेच ग्रामपंचायतीत विषेश ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्यात जामनेर तालुका निवडणूक विभागाने दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्याच्या सूचना गावातील बीएलओंना दिल्या होत्या. परंतु, हे शिबिर शनिवारी शाळा सुटल्यानंतर ते रविवारपर्यंत घेण्याच्या सूचना केलेल्या होत्या.

जेणे करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. परंतु, येथील शाळेत शनिवारी केंद्रीय अन्न महामंडळाचे सदस्य रामेश्वर पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गणेश पांढरे, ईश्वर बारी, विजय पांढरे, दिलीप घोलप, दीपक बारी, ज्ञानेश्वर पांढरे आदींसह मतदान केंद्रप्रमुख गणेश राऊत, भरत वंजारी, मनीषा राऊत, साजिद शेख, रवींद्र घोडके तसेच सर्व बीएलओ उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत बसवून हे शिबिर घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आराेप पालकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...