आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:शिवाजीनगर भागात पाणी निचऱ्याची समस्या; पावसाळ्यापूर्वी गटारी करा

भडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शिवाजीनगर भागामध्ये गटारींचा अभाव असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या १० वर्षांपासून नगरपालिका स्थापन झाली असली तरी या भागात गरज असतांनाही गटारींचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून रोगराई पसरते. गटार नसल्याने नागरिकांना घरांचे पाणी मोकळ्या जागेत सोडावे लागते. शोषखड्डे केले असले तरी ते खडकाच्या भागामुळे ते फुल्ल होतात.

अनेक ठिकाणी पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच गटारींचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगरपालिकेचे वतीने मागील काळात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्या काळात रस्ते उंच झाले. त्यामुळे गटारीचे पाणी निघण्यासाठी जागा उरली नाही. पावसाचे साचलेले पाणी घरांमध्ये शिरून तुंबल्याचे चित्र शिवाजीनगर भागात गतवर्षी बघायला मिळाले होते. तशीच स्थिती या पावसाळ्यात निर्माण होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी येथील गटारीची समस्या दूर व्हावी, यासाठी नागरिकांनी गटारी त्वरित करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी यापूर्वीही अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...