आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३०० वर्षांची हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवणारी उरुसाची परंपरा आपल्या शहराला असून ज्याला देशभरातून नागरिक येतात आणि आपल्या एकीचा संदेश घेऊन जातात. लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या नागरिकांचे सण, उत्सव उत्साहात साजरे झाले पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. दिवाळीला सर्व तालुक्यात मी मिठाई वाटप केली त्याचप्रमाणे आज मुस्लीम बांधवांसाठी ईद मिलन कार्यक्रम आयोजित केला. समाजातील अज्ञान, गरिबी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बेरोजगारी हे आपले शत्रू असून त्यांच्याविरुद्ध आपण लढले पाहिजे असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात केले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश स्मारकाच्या साक्षीने आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी सर्व हिंदू-मुस्लीम बांधवांसाठी शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शहर पोलिस निरीक्षक के.के. पाटील, ग्रामीण पोलिस निरीक्षक संजय ठेंग, योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालचंद बजाज, अत्तार, औरंगाबाद, माजी नगरसेवक फिरोज लाला, लतीफ पहेलवान, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, शेषराव पाटील, प्रेमचंद खिवसरा, धर्मा वाघ, रवींद्र पाटील, सुधीर पाटील, भाजप तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पोपट भोळे, भाऊसाहेब जाधव, अनिल नागरे, हाजी आरिफ, शकील हाजी, संजू पाटील, संजू आबा पाटील, राजू चौधरी, राजूभाऊ राठोड, सरदार राजपूत आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.