आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 मार्चपर्यंत घेता येणार लाभ, बुधवारपासून प्रारंभ‎:चाळीसगावात महिलांसाठी‎ साप्ताहिक आरोग्य शिबिर‎

चाळीसगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम‎ चाळीसगाव व नवजीवन हॉस्पिटल‎ यांच्या संयुक्त विद्यमाने, साप्ताहिक‎ आरोग्य तपासणी शिबिराचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎ यात तज्ञा डॉक्टर महिलांची‎ आरोग्य तपासणी करणार आहेत.‎ त्यात महिलांचे हिमोग्लोबिन, बोन‎ तपासणी , विविध इन्शुरन्स‎ घेतलेल्या रुग्ण महिलांची मोफत‎ प्रसूती, स्त्रीरोग तपासणी,‎ सोनोग्राफीत ५० टक्के सवलत दिली‎ जाणार आहे. हाडांचा ठिसूळपणा‎ तपासला जाणार आहे. हे शिबिर ८‎ ते १४ मार्चपर्यंत दररोज सकाळी १०‎ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.‎

त्यासाठी डॉ.नरेंद्र झोपे, डॉ.स्मिता‎ झोपे, रोटरी क्लबचे डॉ.प्रशांत‎ शिनकर, डॉ.भाग्यश्री शिनकर,‎ डॉ.हरीश दवे, डॉ.स्मिता करमरकर,‎ रवींद्र शिरुडे हे मदत करणार आहेत.‎ रोटरी क्लबचे लालचंद बजाज,‎ आधार महाले, प्रकाश कुलकर्णी,‎ मनोज पाटील, सुभाष करवा, स्मिता‎ करमरकर, वसंत खैरे, वाल्मिक‎ जाधव, भालचंद्र दाभाडे उपस्थित‎ होते. शिबिराचा जास्तीत जास्त‎ महिलांनी लाभ घ्यावा असे‎ आवाहन क्लबचे अध्यक्ष दीपक‎ पाटील यांनी केले आहे. या‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज‎ पाटील यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...