आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:रेल्वेच्या मासिक पास मिळणार कधी? ; विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांची गैरसोय

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. तरीदेखील नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसोबत दररोज अपडाऊन करणाऱ्यांना अजूनही रेल्वे मासिक पासेस दिल्या जात नाहीत. रेल्वेची सेवा सुरळीत होऊन आता वर्षभराचा कालावधी झाला आहे. परंतु चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या भागातील प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. कोणत्याच रेल्वे गाडीची अद्यापही मासिक पास मिळत नाही. कोरोनाची लाट येण्यापूर्वी महाराष्ट्र एक्सप्रेस चाळीसगाव स्थानकावर सकाळी ७.२० ला येत होती. ती आता सकाळी ६ वाजता येतो. त्याआधी महानगरी एक्सप्रेस ५.४० वाजता व त्यानंतर १० मिनिटांनी कुशीनगर एक्सप्रेस येते. कुशीनगर एक्सप्रेसनंतर जळगावला जाण्यासाठी चाळीसगावहून एकही गाडी नाही. सायंकाळी देखील हीच स्थिती आहे. सायंकाळी जळगावला ५ वाजता अमृतसर एक्सप्रेस, लगेच २० मिनिटांनी कुशीनगर एक्सप्रेस, आणि एक तासात महाराष्ट्र एक्सप्रेस. त्यानंतर रात्री साडेनऊला गाडी आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र एक्सप्रेस जुन्या वेळेत सुरू करावी, देवळाली-भुसावळ शटल सुरु करावी, अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...