आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकर भरती:पाच वर्षे सत्तेत असताना नाेकर भरतीस विरोध का केला नाही

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोकर भरतीत गैरव्यवहाराबाबत विरोधकांचे आरोप खोटे असून त्यांनी पाच वर्षे सत्ता भोगली तेव्हा का विरोध नोंदवला नाही. आता आमच्या पॅनलमध्ये जागा न मिळाल्याने असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याची टीका प्रगती पॅनलचे प्रमुख योगेश अग्रवाल यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केली. आमच्याकडे जागा न मिळाल्याने हे पॅनल निवडणुकीत उतरल्याचेही ते म्हणाले. यावेळी नारायणदास अग्रवाल, डॉ. मिलिंद बिल्दीकर, सुरेश स्वार, अॅड.प्रदीप अहिरराव यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून १३ नोव्हेंबर रोजी १६ जागांसाठी मतदान होणार आहे. काही दिवसांपूर्वी परिवर्तन पॅनलकडून नाेकरभरतीत गैरव्यवहारासह इतर आरोप करण्यात आले होते. याबाबत शनिवारी प्रगती पॅनलकडून पत्रकार परिषदेतून ते आराेप फेटाळले.

प्रास्ताविक अहिरराव तर पॅनलची भूमिका बिल्दीकर यांनी मांडली. विरोधकांच्या टीकेमुळे संस्थेची बदनामी होते. संस्थेची प्रगती काहींना सलत असल्याचेही ते म्हणाले. विरोधक निवडणुकीत वा.ग. पूर्णपात्रे यांचे नाव वापरत असले तरी त्यांनी तयार केलेल्या घटनेला विरोध करत असल्याची टीका अॅड.प्रदीप अहिरराव यांनी केली. प्रलंबित घटनेमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याने मॅनेजमेंट बोर्डाने ठराव केला की दुरुस्ती करून प्रस्ताव सादर करावा. यासाठी डॉ.विनोद कोतकर यांच्या समन्वयाने समिती स्थापन केली. सदस्य अॅड.अहिरराव यांच्या मागणीनंतरही घटनादुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला नाही.

घटनादुरुस्तीबाबत निष्क्रियता : बिल्दीकर
दुरुस्ती प्रस्ताव योग्य त्या मसुद्यात तयार करून मॅनेजिंग बोर्डाचे सभेत सादर करणे व सर्वसाधारण सभेत मंजूर घेत त्यासोबत सर्व सभासदांच्या सूचनांचा विचार करून सर्वसमावेशक प्रस्ताव धर्मदाय आयुक्तांकडे योग्य त्या कलमांखाली सादर करणे हे सचिवाचे काम होते. परंतु त्यांनी त्याबाबत निष्क्रियता दाखवली. ही वस्तुस्थिती असून संस्थेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या नाशिक येथील शाळा न्यायाधिकरणाकडे प्रकरणे दाखल आहेत. याबाबत सचिवाची जबाबदारी असतानाही ते एकाही तारखेस हजर राहिले नाहीत. याबाबत साधी विचारणाही केेली नाही. आपल्याला संधी मिळाल्यास घटनादुरुस्ती करून आदर्श घटनेनुसार पुढची निवडणूक घेऊ, असा असेही बिल्दीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

सगळेच विषय वादग्रस्त, परंपरेला गालबाेट लावणारे
नारायणदास अग्रवाल यांनी चेअरमनपद स्वीकारल्यापासून संस्थेचा चेंज रिपाेर्ट, घटना दुरुस्ती असे विषय असाे किंवा नाेकर भरती हे सगळेच विषय वादग्रस्त व संस्थेच्या वैभवशाली परंपरेला गालबाेट लावणारे आहेत. संस्थेचा मानबिंदू असणाऱ्या प्राध्यापकांकडून अपमानित करून नियुक्तीवेळी पैसे वसुली केली नाही, असे नारायणदास अग्रवाल व याेगेश अग्रवाल यांनी प्रचाराचा नारळ वाढवला त्या ग्रामदेवता आनंदामातेच्या साक्षीने सांगून दाखवावे, असे माझे जाहीर आव्हान आहे.डाॅ.विनाेद काेतकर, सचिव, चाळीसगाव एज्युकेशन साेसायटी.

बातम्या आणखी आहेत...