आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची अटक:चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती जेरबंद

चोपडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीच्या डोक्यात वखरणीची लोखंडी पास मारून खून केला. २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कठोरा शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच संशयिताला मध्य प्रदेशातून पोलिसांनी अटक केली. कठोरा शिवारात लिलाबाई बारेला (वय २३) व ग्यानसिंग बारेला (वय २८) हे दांपत्य राहत होते. संशयित ग्यानसिंग पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच झालेल्या वादात त्याने पत्नीच्या डोक्यावर मागच्या बाजूला वखरणीच्या लोखंडी पासने वार केला. २८ रोजी सकाळी ही घटना उघड झाली. याप्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ भाऊ टेमऱ्या बारेला याच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर संशयित पसार झाला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने, २८ रोजी दिवसभर चोपडा तालुक्यात संशयिताचा शोध घेवूनही तो सापडला नाही. म्हणून पीएसआय अमरसिंग वसावे यांनी सहकाऱ्यांसोबत मध्यरात्री मध्यप्रदेशातील वरला पोलिस स्टेशनअंतर्गत असलेले, संशयिताचे सोनखेडी गाव गाठले. रात्रभर शोध घेत असताना संशयित २९ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास, सोनखेडी गावात आपल्या घरी जाताना आढळला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

बातम्या आणखी आहेत...