आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पतीच्या विरहात बहाळ येथे पत्नीची आत्महत्या

बहाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बहाळ कसबे गावातील पतीच्या अपघाती निधनानंतर विरहात त्यांची पत्नी उज्ज्वला पाटील यांनी ही शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शाेककळा पसरली आहे.

बहाळ येथील संदीप पाटील यांची स्वत:ची आयशर गाडी हाेती. ते या गाडीच्या माध्यमातून आपला व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत हाेते. दरम्यान, संदीप पाटील हे १० तारखेला रात्री स्वतःच्या माल वाहतूक आयशर गाडीत भाजीपाला व लिंबूचे कॅरेट घेऊन जात हाेते. या वेळी खडकी फाट्याजवळ झालेल्या अपघातात संदीप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या गाेष्टीला शुक्रवारी सहा दिवस झाले असताना पतीचा मृत्यूच्या विरहाने त्यांची पत्नी उज्ज्वला पाटील (वय ३०) यांनी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास विषारी पदार्थ प्राशन करुन आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. उज्ज्वला पाटील यांना दोन मुले असून माेठा मुलगा हितेश हा ११ वर्षांचा तर लहान मुलगा रोहित हा ९ वर्षांचा आहे. दरम्यान, आईचा मृतदेह पाहून या दाेन्ही लहान मुलांनी टाहो फोडल्याने उपस्थितांचे डाेळे पाणावले हाेते. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांत शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला आहे. चाळीसगाव येथे शवविच्छेदन करुन त्यांच्या मृतदेहावर दुपारी १ वाजता शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...