आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता असते. ध्येय, सहनशीलता व पराक्रमाची शिकवण महिला आपल्या कार्यातून देतात. एवढे असूनही प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे एक महिला असते अशी एका ओळीची झालर लावण्याचे काम इतिहासात करण्यात आले आहे. महिलांमध्ये क्षमता असूनही त्यांच्यावर अनेक निर्बंध आहेत, असे प्रतिपादन प्रा.डॉ. नंदिनी वाघ यांनी केले. पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात, महिला तक्रार निवारण समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रमुख मार्गदर्शक प्रा. दिलीप गिऱ्हे होते. विचार मांडताना ते म्हणाले की, बालपणी पित्याच्या वर्चस्वाखाली, तारुण्यात पतीच्या वर्चस्वाखाली तर वृद्धावस्थेत पुत्राच्या वर्चस्वाखाली जीवन जगणारी स्त्री इतिहासात दिसते.
राजकारणामध्ये पदनामासाठी विराजमान केलेली खुर्चीवरची स्त्री, ही रबरी शिक्का म्हणून वावरत असते. मात्र प्रत्यक्षात तिचा पती व पुत्र राजकारण चालवत असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. आधुनिक युगात महिला शक्ती उद्योग, खेळ, संशोधन, साहित्य व नेतृत्वामध्ये अग्रेसर असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील यांनी केले. तर प्रा. डॉ. अरुण मोरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. आर. अत्तरदे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
इतिहासात अनेक दाखले भारतातील प्राचीन काळातील महिलांची स्थिती, मध्ययुगीन भारतातील रजिया सुलतान, अहिल्यादेवी, जिजाऊ माता, राणी दुर्गावती इत्यादींचे दाखले देऊन मध्ययुगीन काळातील स्त्रियांचे जीवन प्रा.डॉ.वाघ यांनी सांगितले. आधुनिक काळातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी केलेले बदल, पी.टी.उषा, सानिया नेहवाल, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, जयललिता, स्व. लता मंगेशकर यांचाही त्यांनी दाखला दिला. महिलांना चूल आणि मूल एवढेच बंदिस्त करण्याचे काम पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी केल्याची खंत प्रा. डॉ. नंदिनी वाघ यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.