आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतली अाहे. दैनंदिन जीवनात महिला कोणत्याही पदावर असली तरी तिला आजी, आई, बहिण अशा अनेक भूमिका साकारव्या लागतात. बदलाचे नेतृत्व करणाऱ्या जगातील महिलांची शक्ती हेच खरे महिला सबलीकरण अाहे, असे प्रतिपादन डॉ. नूतन राठोड यांनी केले. या वेळी त्यांनी महिला सबलीकरणाचे टप्पे आणि आज सबळ झालेली महिला, त्यांनी मिळवलेल्या दैदीप्यमान यशाचा आढावा पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांसमोर मांडला. एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व युवती सभा मंचच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त नारी सन्मान व गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील अध्यक्षस्थानी तर प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयाचे डॉ. नूतन राठोड उपस्थित होत्या, त्या वेळी त्या बाेलत हाेत्या.
मंचावर उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. नरेंद्र तायडे, प्रा. विजय गाढे, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ. स्वाती शेलार, डॉ. रेखा साळुंखे, डॉ. सविता पाटील, प्रा. आत्माराम चिमकर, डॉ. नितीन दांडेकर, प्रा. महेंद्र शिरसाठ, प्रा. सुनील सजगणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. स्वाती शेलार यांनी केले. कार्यक्रम उद्देश तसेच महिला दिनाचा इतिहास सांगितला. प्रा. नरेंद्र तायडे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी महिलांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचा आढावा घेतला. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थिनी जयश्री पाटील, करुणा पाटील, प्राची मोरे यांनी महिला अबला ते सबला असा प्रवासाचा देखावा व नृत्य अविष्कार व पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केला. सूत्रसंचालन प्रा. विजय गाढे तर डॉ. शर्मिला गाडगे यांनी आभार मानले.
या कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांनी केला गाैरव
या कार्यक्रमांतर्गत विखरणच्या सरपंच नम्रता गायकवाड, जवखेडा बुद्रुक येथील सरपंच सुनीता महाजन, उपसरपंच रंजनाताई पाटील यांचा त्यांच्या राजकीय वाटचाल व कार्यानिमित्त सन्मान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.