आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​चोपडा येथील कार्यक्रमात डॉ.स्मिता पाटील यांचे आवाहन‎:प्रशिक्षणाचा लाभ घेऊन‎ महिलांनी स्वावलंबी व्हावे‎

चोपडा‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय‎ भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण‎ संस्थान जळगावतर्फे, जागतिक महिला‎ दिन साजरा करण्यात आला. संस्थानच्या‎ अध्यक्ष डॉ.स्मिता पाटील यांनी यांनी‎ महिलांनी जन शिक्षण संस्थानच्या विविध‎ प्रशिक्षणांचा लाभ घेत स्वावलंबी व्हावे,‎ असे आवाहन केले. संशोधन व तंत्रज्ञान‎ क्षेत्रात कार्यरत महिलांचा विशेष सन्मान‎ करण्यात यावा असे प्रतिपादन त्यांनी केले.‎ कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या चोपडा‎ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या निरीक्षक कावेरी‎ कमलाकर यांनी, प्रतिकूल परिस्थितीत‎ केलेल्या वाटचालीचा वृत्तांत सांगितला.‎ यशस्वी करिअर कसे करावे या विषयावर‎ बहुमोल मार्गदर्शन केले. व्याख्याता सुरेखा‎ पाटील यांनी महिलांचे ताणतणाव योग व‎ ध्यानधारणा विषयावर प्रात्यक्षिकांसह‎ मार्गदर्शन केले.

यशस्वी प्रशिक्षणार्थींना‎ मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप‎ करण्यात आले. कला, शास्त्र, वाणिज्य‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डी.ए.सुर्यवंशी,‎ उपप्राचार्य के.एन.सोनवणे, डॉ.प्रमोद‎ पाटील, वृषाली देशमुख उपस्थित होते.‎ प्रास्ताविक रवींद्र कुडाळकर यांनी केले.‎ क्रांती क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.‎ यशस्वीतेसाठी माया शिंदे, डॉ.प्रीती‎ रावतोळे, किर्ती पाटील, विकास भदाणे,‎ योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.‎ विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...