आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिनानिमित्त झाले कार्यक्रमाचे आयोजन‎:कजगावात विविध क्षेत्रात‎ कार्यरत महिलांचा सत्कार‎

कजगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त विविध‎ क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात‎ आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती‎ अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,‎ पंचायत समिती भडगाव, तालुका अभियान‎ व्यवस्थापन कक्ष व उमेद अभियान अंतर्गत,‎ कजगाव येथील भरारी महिला ग्राम‎ संघातर्फे हा कार्यक्रम झाला.‎ महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन‎ करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन‎ करताना अॅड. संध्या साळुंखे यांनी‎ महिलांना कायद्याचे स्वरूप स्पष्ट केले.‎ महिलांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर‎ होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायद्याचे संरक्षण‎ मिळते. भडगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक‎ राजेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की,‎ महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची‎ नोंद पोलिस स्टेशनला करावी. स्वप्निल‎ पाटील, माजी सरपंच वैशाली पाटील,‎ आयोजक प्रतिभा साठे, रवींद्र साठे, प्रवीण‎ पाटील, प्रिया अमृतकार, अॅड. वसुधा‎ पाटील हे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...