आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:काळ्या फिती लावून केले काम; संरक्षण द्या, डॉक्टरांची मागणी; चाळीसगाव ‘आयएमए’तर्फे निवेदनाद्वारे निषेध

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील लालकोट येथील नामांकित स्त्रीरोग तज्ञ डॉ.अर्चना शर्मा यांनी राजकीय दबाव, खंडणी आणि मानसिक त्रास या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. डॉ.शर्मा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घटकांचा चाळीसगाव येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण मिळावे अशी मागणी करणारे निवेदन येथील तहसीलदारांना दिले. रुग्णांची गैरसाेय होऊ नये यासाठी दवाखाने बंद न ठेवता काळ्या फिती लावून डॉक्टरांनी निषेध केला.

प्रत्येक डॉक्टर हा रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा स्थितीत एखाद्या रुग्णाबाबत दुर्दैवी घटना घडल्यास डॉक्टरांना जबाबदार धरले जाते. अशी प्रवृत्ती समाजात वाढली आहे. अशाच घटनेतून स्त्रीरोग तज्ञ डॉ.अर्चना शर्मा यांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. तेथील काही समाज घटकांनी डॉ.शर्मा यांच्यावर राजकीय दबाव आणून खंडणी मागितली. या मानसिक त्रासाला व होणाऱ्या बदनामीला कंटाळून डॉ. शर्मा यांनी आपले जीवन संपवले. या घटनेने डॉक्टर वर्गास मोठा धक्का बसून त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. बंद पाळून डॉ.शर्मा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केला.

यावेळी डॉ.कोतकर यांच्यासह सचिव डॉ.सुनील राजपूत, डॉ.शुभांगी पूर्णपात्रे, डॉ.अनुप परमार, डॉ.राजानी, डॉ.शशिकांत राणा, डॉ.धर्मराज राजपूत, डॉ.सुलभा साळुंखे, डॉ.सारिका परदेशी, डॉ.स्मिता झोपे, डॉ.सत्यजित पूर्णपात्रे, डॉ.कुळकणी, डॉ.प्रशांत शिनकर, डॉ.कुणाल तलरेजा, डॉ. सौरभ अरकडी, डॉ.अभिजित राखुंडे, डॉ.श्रीरंग देशमुख, डॉ.स्वप्नील लढे, डॉ.नरेंद्र झोपे, डॉ.दिगंबर तेंडुलकर आदी उपस्थित होते.

घटनेबाबत आयएमएकडून झाली चिंता व्यक्त
चाळीसगाव येथेही इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करून या प्रवृत्तींचा निषेध केला. तसेच डॉक्टरांना संरक्षण द्यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. सध्या कोरोना, उष्णतेची लाट आणि त्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती पाहता रुग्णांची हेळसांड होवू नये म्हणून रुग्णालये बंद न ठेवता केवळ काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...