आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाचे काम ठप्प:शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे वाघूरवरील पुलाचे काम ठप्प; जुन्या पुलाला तडे

वाकोद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोदजवळ व दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या नवीन पुलाचे काम शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे ठप्प झाले आहे. तर जुन्या पुलाला अनेक भेगा व तडे पडलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी हा धोकेदायक ठरत असून पावसाळ्यात यावर वाहतूक ठप्प पडण्याची भीती आहे.

जळगाव ते औरंगाबाद महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी हे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावरील वाकोद ते फर्दापूर दरम्यान वाघूर नदीवर नवीन पुलाचे काम शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे थांबले आहे. तर सध्या जुन्या पुलावरून वाहतूक सुरु आहे. या जुन्या पुलाला ठिकठिकाणी तडे व भेगा पडलेल्या आहेत. तसेच या पुलाचे कठडे ही तुटलेले आहेत.

पुलाच्या खालील भागातून लोंखडी सळई मधून सिमेंट खाली पडत आहे. त्यातच दिवसरात्र हजारो प्रवासी वाहनांसह अवजड वाहने या पुलावरून जात असतात. त्यामुळे पावसाळ्यात हा पुल धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवरील वाकोद गावाजवळ हा पुल आहे. पुलाच्या पलीकडे औरंगाबाद जिल्ह्याची सीमा सुरू होते. आड नदीचा पुल म्हणूनही याला ओळखले जाते.

बातम्या आणखी आहेत...