आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्सव:अमळनेरात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन ; हॅलो अमळनेर संकल्पना रुजवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा केला सत्कार

अमळनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील महाराणा प्रताप यांच्या स्मरकाजवळ महापूजन करण्यात आले. या वेळी स्मारकाच्या बाजूलाच नगर परिषदेच्या सहयोगाने “हॅलो अमळनेर’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना साकारल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर यासाठी सहकार्य करणारे छायाचित्रकार महेंद्र पाटील यांचेही कौतुक करण्यात आले. अमळनेर तालुका राजपूत एकता मंच, अमळनेर तालुका राजपूत समाज पंच मंडळ आणि श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी शहरातील महाराणा प्रताप चौकातील स्मारकस्थळी उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. या वेळी चैतन्य बहुउद्देशीय संस्थेच्या नादब्रह्म महिला ढोल पथकाने उत्कृष्ट कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या वेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ व माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे महापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. या वेळी हरी वाणी, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, गिरीशसिंह परदेशी, विनोदसिंह राऊळ, श्याम अहिरे, संजय पाटील, प्रवीण जैन, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, जितेंद्र जैन, विक्रांत पाटील, अॅड. विवेक लाठी, प्रसाद शर्मा, राजेश पाटील, राजू फाफोरेकर, जिजाब पाटील, राकेश पाटील, संजय चौधरी, डॉ. शरद पाटील, योगराज संदानशिव आदी हजर होते.

यांचे मिळाले सहकार्य या वेळी स्वर्गीय बाबूसिंग परदेशी प्रतिष्ठानतर्फे मोफत सरबत वाटण्यात आले. या वेळी राजपूत समाजबांधव, श्री महाराणा प्रताप प्रेमी व महिला, तरुण हजर होते. सोहळ्यास तालुका राजपूत एकता मंच, राजपूत समाज पंच मंडळ व महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...