आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील शहीद भगतसिंग चौकात महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, माल्यार्पण करून अभिवादन केेले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी माल्यार्पण केले. या प्रसंगी शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन भागवत, मयूर बागुल, प्रभाकर बिचवे, किशोर महाजन, खुशाल मांडगे, विकास मोरावकर, गणेश अहिरराव, भिकन अहिरराव, भूषण भागवत, तेजेंद्र चौधरी, अमोल सोनार, भूषण पाटील, आनंद मानकर, किरण सोनवनी, सागर जगताप तसेच नवदुर्गा मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन शहीद भगतसिंग मित्र मंडळाने केले होते. ‘इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज़्बातों से, अगर मैं इश्क लिखना भी चाहूँ, तो इन्कलाब लिख जाता है'' असे शहीद भगतसिंग म्हणायचे. अशा महान देशभक्त, क्रांतीवीर, शहीदे आजम शहीद भगतसिंग यांचे कार्य आजच्या पिढीसाठी अखंड ऊर्जा व प्रेरणा-स्त्रोत असल्याचे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.