आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानित‎:रोटरी गौरव पुरस्काराने चाेपडा येथील‎ साहित्यिक राजेंद्र पारे सन्मानित‎

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील साहित्यिक राजेंद्र पारे यांना चोपडा रोटरी‎ क्लबने आयोजित केलेल्या रोटरी उत्सव कार्यक्रमात साहित्य‎ क्षेत्रातील योगदानाबद्दल रोटरी गौरव पुरस्काराने सन्मानित‎ करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचे‎ माजी अध्यक्ष अरुण गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून चोसाकाचे‎ माजी चेअरमन घनश्याम पाटील, उपविभागीय पोलिस‎ अधिकारी कृषिकेश रावले, रोटरीचे प्रांतपाल झुणझुणवाला,‎ रोटरीचे अध्यक्ष रुपेश पाटील, सचिव गौरव महाले, प्रकल्प‎ प्रमुख चेतन टाटिया उपस्थित होते. राजेंद्र पारे हे गणपूर येथे‎ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर, मागचं दार, बुद्धांचा मार्ग, ठिगळ अन् टाके, बुद्धा इज‎ स्माईलिंग (कादंबरी), निब्बान (कादंबरी), आपले संविधान‎ आणि आपला सन्मान अशी त्यांची लेखन संपदा आहे. त्यांना‎ महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार, जिल्हा शिक्षक‎ पुरस्कार तसेच विविध संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...