आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेअरमनपद:यशवंत पीक संरक्षण संस्था चेअरमनपदी राजेंद्र महाजन

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील यशवंत सहकारी पीक संरक्षण संस्थेच्या चेअरमन पदी राजेंद्र धनराज महाजन यांची तर व्हा.चेअरमनपदी रमेश पांडुरंग भदाणे यांची १ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली

या बैठकीत पदाधिकारी निवडीसह इतर विविध महत्त्वपूर्ण विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान नूतन चेअरमन या निवडीबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, भाजप जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, परशुराम पेंटर, युवराज पाटील, संस्थेचे संचालक अरुणाबाई परदेशी, अरुस्तलबाई पाटील, नथ्थू अहिरे, मोहब्बत अली सय्यद, सुनील शिंदे, भाऊसाहेब पाटील, श्रावण भोई, बळीराम महाजन, भगवान धनगर, दिवाकर पवार, सुरेश गंजे यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे. सर्वत्र त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...