आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोय मी गुवाहाटीला चाललो आहे, जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार तिकडे पोहचले आहेत. मी एकटा राहून काय करू?, असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीकडे रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले. माझ्या रक्तात शिवसेना आहे, बंडाळीनंतर शिवसेनेच्या स्थितीबाबत ते म्हणाले, अत्यंत वाईट परिस्थिती आहे, सर्वच फाटल आहे. वातावरण पाहून पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा होता. परंतु आता तिही वेळ निघून गेली आहे. मी पक्ष बदलणार नाही, शिवसैनिक म्हणूनच कार्य करणार आहोत. भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही. सुरतहून ते चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित विमानाने गुवाहाटीला रवाना झाले. दरम्यान, पाळधीत शुकशुकाट होता.
सकाळी ११ला फोन आला, नंतर सुरत गाठून विमानाने गुवाहाटी
बुधवारी शिवसेनेसोबत असल्याची माहिती देणारे मुक्ताईनगरचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे देखील गुरुवारी एकनाथ शिंदे यांना जावून मिळाले. ते जळगाव येथून सूरत व तेथून विमानाने गुवाहाटीला गेले. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांना संपर्क केला असता ते नॉट रिचेबल होते. तत्पूर्वी, बुधवारी रात्री ११ वाजता ते मुंबई येथून मुक्ताईनगर येथील निवासस्थानी पोहोचले. सकाळी ११ वाजता त्यांना फोन आला. नंतर ते जळगाव विमानतळावरून खासगी विमानाने थेट गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर आली.
मी सदैव शिवसेनेसोबतच, पालकमंत्र्यांची भूमिका वैयक्तिक
सध्या शिवसेनेमध्ये शिंदे गटाने जे बंड पुकारले आहे ते अयोग्य आहे. त्या ऐवजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग निघाला असता. शिंदे गटाला आमिष दाखवून आज जे चित्र निर्माण केले आहे त्यामागे भाजपाची खेळी आहे. हिंदुत्व हा मुद्दा शिवसेनेचा प्रमुख विषय आहे तो शिवसेनेने सोडलेला नसल्याने मी शिवसेनेसोबतच आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेली भूमिका ही विधानसभा सदस्य संदर्भात असल्याने तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.
गुलाबराव वाघ,सहसंपर्कप्रमुख, शिवसेना
उद्धव ठाकरेंसोबतच राहू आम्ही कट्टर शिवसैनिक होतो व पुढेही राहू. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच राहू. शिवसैनिक केवळ आदेश पाळतो, मी तर पक्षाचा जिल्हाप्रमुख अर्थात पदाधिकारी आहे. यामुळे पक्षाचा आदेशच पाळेल.
पक्ष प्रमुखांच्या आदेशास बांधील शिवसेनेत यापूर्वी राणे, भुजबळ, राज ठाकरे यांनीही सेना संपवण्याची भाषा केली पण उलट सेना जोमाने पुढे सरकली. आताही पक्ष प्रमुख जे आदेश देतील, तो मान्य आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत. डॉ. हर्षल माने, जिल्हा प्रमुख शिवसेना समाधान महाजन, जिल्हा प्रमुख
जे घडतय ते धक्कादायक पक्षात फुट पडणे हे मनाला न पटणारे आहे. जे काही घडतय ते धक्कादायक आहे. संघटनेवर माेठा घाला आहे. आजपर्यंत संघटना वाढवणाऱ्यांनी पुन्हा चर्चेचे माध्यम निवडणे गरजेचे आहे. यातून सकारात्मक निर्णय होतील. विष्णू भंगाळे, जिल्हा प्रमुख, शिवसेना. मार्ग निघेल असा विश्वास शिवसेनेतील वाद हे घरातील वाद आहे. अद्याप कोणीही शिवसेना साेडलेली नाही. आजही सर्व शिवसेनेतच आहेत. नाराजी असली तरी ती दूर करण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सर्व स्थितीवर तोडगा निघेल. जयश्री महाजन, महापौर, जळगाव
आम्ही ठाकरेंसोबतच आम्ही कुठेही जाणार नाहीत. कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. कोणी कुठेही गेले तरी आम्ही जिथे आहोत तिथेच राहू. कोण कुठे गेले याचा आम्ही विचार करत नाहीत. आम्ही सदैव ठाकरेंसोबत आहोत, यापुढेही नेहमी राहू. शरद तायडे, महानगर प्रमुख
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.