आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणज्योत विझली:सर्पदंशानंतर उपचार घेताना युवकाचा मृत्यू ; वडिलांसोबात शेतात करत होता काम

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे वडिलांसोबात शेतात काम करताना, बारावीत शिकणाऱ्या युवकाला २६ सप्टेंबरला सर्पदंश झाला होता. अखेर उपचार सुरु असताना ४ रोजी सकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत विझली. गौरव सुनील बडगुजर असे मृत तरुणाचे नाव आहे. गौरव हा २६ सप्टेंबरला त्याच्या वडिलांसोबात शेतात काम करत होता. अचानक त्याला पायास काहीतरी चावल्याचा भास झाला. त्यानंतर भोवळ आल्याने ते बेशुद्ध झाला. वडिलांनी गौरवला पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करून त्याला तात्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ४ रोजी सकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. परिसरात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...