आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:चिंचपुऱ्याजवळ कार, ट्रकच्या‎ अपघातात तरुण ठार; दोघे जखमी‎

धरणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचपुरा‎ गावाजवळ कार व आयशरमध्ये‎ झालेल्या भीषण अपघात एक तरुण‎ ठार तर दोन जण जखमी झाल्याची‎ घटना गुरुवारी रात्री साडेआठ‎ वाजेच्या सुमारास झाला.‎ चिंचपुराजवळ आयशर‎ (एमएच- १९, झेड- ९००२) आणि‎ कार (एमएच- ०४, डीबी- ५९४१)‎ ही वाहने समोरासमोर एकमेकाला‎ धडकल्याची घटना गुरुवारी रात्री‎ साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.‎

या अपघातात कारमधील नरेश‎ पाटील (वय ३० हिरापूर, ता.‎ पारोळा) हा तरुण जागीच ठार‎ झाला तर समाधान पाटील (रा.‎ तांडा खडके, ता. एरंडोल) हे‎ जखमी झाले. तसेच ट्रकचालक ही‎ जखमी झाला असून त्याच्यावर‎ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात‎ उपचार करुन पुढील उपचारार्थ‎ जळगावच्या खासगी रुग्णालयात‎ दाखल केले अाहे. तपास पाेनि‎ राहुल खताळ करत अाहेत.‎

बातम्या आणखी आहेत...