आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना:युवक राष्ट्रवादीचेे तालुका अध्यक्ष पाटील शिवसेनेत

भडगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भडगाव तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. या प्रवेशाने भडगाव तालुक्यासह विशेषत: आमडदे गणात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

वाक ग्रा.पं.चे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पाटील यांनी नुकताच आपल्या या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आमदार पाटील यांच्याशी चर्चा करत पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यांनी शुक्रवारी रात्री पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात वाक व वलवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला. यात राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांसह वलवाडी ग्रामपंचायत सदस्यांनीही प्रवेश केला. यावेळी पाटील यांनी सांगितले की, तालुक्याच्या विकासासाठी मी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करत आहे.

आगामी काळात संघटन मजबूत करण्यावर भर राहणार आहे. आमदार पाटील हे मला जी जबाबदारी देतील ती सक्षमपणे पेलू, असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार पाटील म्हणाले की, स्वप्निल यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यापैकी काही कामे मंजूर तर काही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यावेळी पक्षाचे तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, युवराज पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख पुरुषोत्तम महाजन, महेंद्र ततार, नीलेश पाटील, पाचोरा तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...