आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहित्यातील इतिहासाची पाने चाळली तर सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला आहे, हे लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार आपल्याला सहजच मिळवून दिला. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुदृढ करण्यासाठी नवतरुणांनी पुढे आले पाहिजे, असे उपप्राचार्य प्रा.डॉ. वासुदेव वले प्रतिपादन केले. पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय, शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले हाेते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बाेलत हाेते.
प्रमुख वक्ते तहसीलदार कैलास चावडे यांनी लोकशाही सक्षम करण्यासाठी नवीन मतदाराने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी होते, या संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी विचार मंचावर प्राचार्य प्रा.डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. जे. व्ही. पाटील, नायब तहसीलदार रणजीत पाटील, प्रतिभा लोहार, जयंत जाधव, उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा.डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. आर. ठाकरे, प्रा. पी. आर. सोनवणे, भिकन गायकवाड, हिरालाल महाजन, सुधाकर सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले, प्रास्ताविक डॉ. के. एस. इंगळे व प्रा. नितीन पाटील यांनी आभार मानले.
स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी मिळवले यश ... राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुदृढ लोकशाहीत मतदारांची भूमिका या विषयावर निबंध स्पर्धा व मतदार जनजागृती या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत १८ तर रांगोळी स्पर्धेत ९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक छकुली अनिल मिस्तरी, द्वितीय यातिका उमेश पाटील तर दीपिका अरुण पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. रांगोळी स्पर्धेत पौर्णिमा लक्ष्मण पाटील प्रथम, नंदिनी धनवीर गुरखा द्वितीय तर यातिका उमेश पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस सोनी सोनवणे हिने मिळवले. कार्यक्रमाला १३० विद्यार्थी हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.