आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण:1 हजार 658 हॉकर्सची नोंद; सर्वेक्षण मंदावले

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे शहरातील सर्व भागातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी ठेकेदार नेमला असून सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरू आहे. आत्तापर्यंत १ हजार ६५८ फेरीवाल्यांची नांेद झाली आहे. शहरात फेरीवाल्याची समस्या गंभीर असून, त्यांच्यासाठी अद्यापही स्वतंत्र हॉकर्स झोन नाही. फेरीवाले शहरातील जुन्या आग्रा रस्त्यावर उभे राहतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी हाेते.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनातर्फे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण होते आहे. त्यासाठी प्रकल्प विभागातर्फे ठेका देण्यात आला आहे. ठेकेदारातर्फे फेरीवाल्यांची जागेवर जाऊन नोंदणी होते आहे. त्यांचे त्यांचे आधार कार्ड, पॅन कॉर्ड व रहिवासी दाखल घेतला जातो आहे. सर्वेक्षण करण्याचा ठेका देऊन दीड वर्ष झाले असून मध्यंतरी ऑनलाइन नोंदणीचे काम रखडले होते. काही दिवसांपासून नोंदणी पुन्हा सुरू झाली आहे पण हे काम संथगतीने सुरू आहे. सर्वेक्षण जानेवारी महिन्यात पूर्ण हाेईल, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

शहरात साधारणपणे ३ हजार फेरीवाले असण्याची शक्यता आहे. हद्दवाढीनंतर शहरात दहा गावांचा समावेश झाल्याने या गावातील फेरीवाल्यांचीही नोंदणी करावी लागणार आहे. महापालिकेतर्फे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाल्यावर त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ फेरीवाल्यांना देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...