आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेकांची आर्थिक पिळवणूक करून लूट करणारा सावकार राजेंद्र बंबवर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई झाली. त्याच्या आणखी एका बँक लॉकरची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल १० कोटी ७३ लाखांचे घबाड मिळाले. यात विविध देशातील ५८ विदेशी चलन व सुमारे ५ कोटी रुपयांची रोकड आहे.
विमा पॉलिसीच्या आडून अनेकांना खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकावणारा राजेंद्र बंब पोलिस कोठडीत आहे. पोलिस यंत्रणा त्याच्या आर्थिक बाबी तपासत आहे. शुक्रवारी त्याचे शिरपूर को- ऑपरेटिव्ह बँकेतील लॉकर शुक्रवारी उघडण्यात आले. त्यात ५ कोटी १३ लाख ४४ हजार ५३० रोकडसह सुमारे १० किलो ५६३ ग्रॅम सोन्याचे विविध दागिने, ५ लाख १४ हजार ९११ रुपये किंमतीची सुमारे ७ किलो ६२१ ग्रॅम चांदी सापडली. याशिवाय सुमारे ६७ सोन्याचे बिस्कीट तर मोठया कॅटबरीच्या आकाराचा एक टोलचाही समावेश आहे. तसेच वेगवेगळ्या ५८ परदेशी चलनाच्या नोटा मिळाल्या आहेत. यू.एस व हाँगकाँग डॉलरच्या स्वरुपात हे चलन आहे. त्याची किंमत काढण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.
धुळ्यात सलग तिसऱ्या पोलिस दिवशी कारवाई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.