आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:मूल्यांकनावर हरकतींसाठी 10 दिवस मुदतवाढ ; दहा गावांमध्ये मालमत्तांची मोजणी पूर्ण

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे मालमत्तांचे मूल्यांकन झाले. त्यानंतर मालमत्ता धारकांना कर वसुलीच्या नोटीस देण्यात आल्या. मूल्यांकनावर हरकत नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी ५११ हरकती दाखल झाल्या. हरकती दाखल करण्यासाठी दहा दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरातील मालमत्तांचे मोजमाप करण्यासाठी मनपाने ठेका दिला आहे. हद्दवाढीच्या क्षेत्रातील दहा गावांमध्ये मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली आहे. शहरात मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्यांच्या मालमत्तांचे मोजमाप झाले आहे त्यांना मालमत्ता कराची नोटीस देण्यात आली. पण अनेकांनी कर वाढल्याची तक्रार करत हरकत नोंदवली आहे. हद्दवाढीतील गावातून सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहे. हरकत दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. दिवसभरात ५११ हरकती दाखल झाल्या. दुसरीकडे हरकत दाखल करण्यासाठी पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...