आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी महामंडळाच्या धुळे विभागात मार्च महिन्यापर्यंत १०० नवीन बस दाखल होतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. त्यांनी शुक्रवारी धुळे बसस्थानकाची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी धुळे मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी केली. बसस्थानकातील अस्वच्छता पाहुन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस व स्थानकाच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रीत करावे. दिवाळीत धुळे विभागाने राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवले होते. धुळे विभागाला मार्च महिन्यापर्यंत नवीन शंभर बस देण्यात येतील.
तसेच ३१ मार्चपर्यंत धुळे बसस्थानकाचे स्वरूप बदलले जाईल. एसटी महामंडळातर्फे राज्यभरात सुरक्षा सप्ताह राबवण्यात येणार असून याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याची माहिती शिवाजी जगताप यांनी दिली. या वेळी शिवाजी जगताप यांनी एसटी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.