आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाठ्यपूस्तक , पोषण आहाराचा शाळांना 100 टक्के पुरवठा ; 205  शाळांना गणवेश निधीची आली अडचण

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षे कारोनाच्या संघर्षामुळे शाळा बंद होत्या. मात्र आता पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक, गणवेश देण्यात येणार आहेत.तसेच विद्यार्थ्यांसाठी गोड पोषण आहार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये शंभर टक्के पाठ्यपुस्तक पोहाेचली आहेत. तर ९१६ शाळांमध्ये गणवेशासाठीचा निधी देण्यात आला आहे. तर पीएफएमएस प्रणालीत येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे २०५ शाळांमध्ये मात्र गणवेश निधी पोहाेचण्यास अडसर आहे. त्यावर मात करत या शाळांमध्येदेखील पहिल्या दिवशी गणवेश मिळावे या करिता प्रयत्न करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी दिली आहे.

बायोगॅस’ फेरनिविदा; ओला कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार १३ तारखेला जिल्ह्यातील सर्वच शाळा उघडणार आहेत. मात्र या दिवशी प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. तर १३ आणि १४ जून हे दोन दिवस शाळा प्रवेशोत्सवाची तयारी करण्यासाठी राहणार आहेत. प्रत्यक्षात १५ जून रोजी विद्यार्थी शाळेत दाखल होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक देण्यासह पहिल्या दिवशी गोडधोड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एक हजार ६३२ शाळांमधील दोन लाख २२ हजार ७६७ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरित करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ९१६ शाळांना गणवेशाचा ४ कोटी ३३ लाख ७० हजारांचा मिळाला निधी जिल्ह्यातील १ हजार १२१ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुली,अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातील मुले, दारिद्र्यरेषेखालील मुले हे गणवेशासाठी पात्र आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी ६०० रुपये देण्यात येणार आहेत.

याकरिता ५ कोटी १९ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा निधी आला आहे. या पैकी जिल्ह्यातील ९१६ शाळांना ४ कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र पीएफएमएस प्रणालीत शिरपूर, साक्री आणि धुळे तालुक्यातील काही शाळांचे मॅपिंग होत नसल्याने २०५ शाळांना गणवेश निधीचा पुरवठा झालेला नाही. परिणामी या शाळांमध्ये पहिल्या दिवशी गणवेशाचे वाटप करण्यास अडचणी येणार आहेत.ही अडचण विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांनी क्रेडिटवर गणवेश वाटपची सूचना केली आहे.

विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याचे आहे नियोजन
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याचे नियोजन आहे. पाठ्यपुस्तक, गणवेश आणि पोषण आहार पहिल्या दिवशी देण्यात येणार आहे. गणवेशाचा निधी वाटप करण्यात आला आहे. ज्या शाळांमध्ये तांत्रिक अडचण आहे. ती दूर करत शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल या दृष्टीने प्रयत्न आहे. राकेश साळुंखे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

बातम्या आणखी आहेत...